Saturday, January 24, 2026
Homeक्राईमAhilyanagar : झेंडीगेट परिसरातील कत्तलखाने जमीनदोस्त

Ahilyanagar : झेंडीगेट परिसरातील कत्तलखाने जमीनदोस्त

महापालिका व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखान्यांविरोधात कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन झाले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन मनपाने पोलिसांच्या मदतीने गुरूवारी (18 सप्टेंबर) झेंडीगेट-व्यापारी मोहल्ला परिसरातील चार अवैध कत्तलखाने उध्दवस्त केले. दोन जेबीसींनी पत्र्याच्या शेड स्वरूपात बांधलेले हे कत्तलखाने नेस्तनाबूत करून टाकले. या कारवाईला काहींचा विरोध झाला. येथे कत्तलखाने नाहीत, असे दावेही केले गेले. पण पोलिसांनी मागे या ठिकाणाहून गोमांस जप्त केल्याच्या केलेल्या कारवाईसह यासंदर्भात दाखल गुन्ह्यांच्या पुराव्यांच्या आधारे कारवाई केली गेली.

- Advertisement -

यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने व मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली कत्तलखान्यांचे शेड तोडून टाकले. ही कारवाई शहराच्या विविध भागात सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी कोठला येथे आ. संग्राम जगताप व विक्रम पाचपुते यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून रस्ता रोको केला. मनपाव्दारे अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे मनपा आयुक्तांविरूध्द जोरदार घोषणाबाजीही झाली. अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करून त्यांची बेकायदेशीर बांधकामे तत्काळ पाडावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अवैध कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाईची ग्वाही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली. त्यानंतर बुधवारी (17 सप्टेंबर) मनपा अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांनी झेंडीगेट परिसरात पाहणी केली.

YouTube video player

पोलिसांनी ज्या कत्तलखान्यांवर कारवाई केली होती, त्या बांधकामांची पाहणी करून माहिती घेतली गेली व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून कारवाईचे नियोजन केले गेले. मनपा व पोलिसांनी गुरूवारी सकाळी झेंडीगेट-व्यापारी मोहल्ला परिसरात केलेल्या संयुक्त कारवाईत, ज्या ठिकाणी आधी गोमांस जप्तीची कारवाई केली गेली तसेच जेथे कत्तलीसाठी गोवंश डांबून ठेवल्याच्या घटना उघडकीस आल्या, अशा ठिकाणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती व पुरावे घेऊन तेथीलच बांधकामे तोडली गेली. या पाच ठिकाणांपैकी बहुतांश ठिकाणी पक्क्या भिंती व त्यावर पत्र्याच्या शेड होत्या. दोन जेसीबी, अग्निशामक दलाचे वाहन, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचार्‍यांच्या तयारीने मोहीम राबवली गेली. यावेळी काहींनी या तोडातोडीस विरोध केला. पण ते मोडून काढून पाच शेड जमीनदोस्त करण्यात आले.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...