Wednesday, June 19, 2024
Homeनाशिकझिरवाळांचा मविआला पाठिंबा?

झिरवाळांचा मविआला पाठिंबा?

व्हायरल पोस्टमुळे चर्चेला उधाण

- Advertisement -

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

एका कार्यक्रमात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महाविकास आघाडीचे उमेद्वार व नेते यांच्याबरोबर एकत्र आले. तो फोटो सर्वत्र व्हायरल होवून महाविकास आघाडीला पाठिंंबा दिल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. परंंतू त्यावर ना. नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण देत त्या चर्चेला पूर्णविराम दिला.

दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हनुमान मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना आमंत्रीत केले होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे उमेद्वार भास्कर भगरे यांची प्रचार सभा सुरु होती आणि त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आगमन झाल्याने त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी बसण्याची विनंती केली. गावकर्‍यांच्या आग्रहास्तव आ. झिरवाळांना व्यासपीठावर बसावे लागले.

यावेळी व्यासपीठावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, स्वत: उमेद्वार भास्कर भगरे आदी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल होत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाले. ही पोस्ट चर्चेची ठरत अवघ्या मतदार संघात ही पोस्ट फिरल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या उमेद्वार डॉ. भारती पवार यांची देखील धाकधुक वाढलेली होती. परंतू याबाबत आ. नरहरी झिरवाळांना विचारणा केली असता त्यांनी योगायोगाने झालेल्या भेटीचे स्पष्टीकरण देत आपण महायुतीतच आहोत, असे प्रतिपादन करुन चर्चेंना पुर्णविराम दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या