Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : झेडपी, पंचायत समितीसाठी दोन हजार यंत्रांची कमतरता

Ahilyanagar : झेडपी, पंचायत समितीसाठी दोन हजार यंत्रांची कमतरता

निवडणूक आढावा बैठकीत आवश्यक संख्येत यंत्रांची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायतीसह अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी टप्प्याने तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आलेले आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या तयारीसाठी मागील आठवड्यात विभागीय महसूल आयुक्तांनी नगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या आढाव्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 471 सीयू (कंट्रोल युनिट) आणि 1 हजार 272 बॅलेट युनिटची क्षमता असून त्यांची मागणी नोंदवण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

नगरसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय मतदान केंद्रांची यादी निश्चित करणे, मतदान कर्मचारी व अधिकारी यांची नियुक्ती केली जात आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणार्‍या इतर प्रक्रियांसह प्रशासकीय तयारी सुरू आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यात झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची प्रथम तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

YouTube video player

या तपासणीनंतर यंदा जिल्ह्यात प्रत्येक गावातील मतदान बुथची संख्या वाढणार असल्याने गरजेपेक्षा दिडपट अधिक मतदान यंत्रे उपलब्ध करून घेण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणा ऐनवळी अडचण नको म्हणून कार्यवाही करताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात 1 जुलै 2025 पर्यंत 30 लाख 6 हजार 816 मतदारांची नोंदणी झालेली असून, विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यात 3 हजार 132 मतदान केंद्र होते. आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात 3 हजार 705 मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या वाढीव मतदान केंद्रांसाठी वाढीव मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने विभागीय आयुक्त यांच्याकडे वाढीव 471 कंट्रोल युनिट आणि 1 हजार 272 बॅलेट युनिटची मागणी नोंदवली असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार विभागीय आयुक्त नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यासाठी आवश्यक असणार्या मतदान यंत्रे (बीयू आणि सीयू) यांची एकत्रित राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असून, ती उपलब्ध झाल्यावर जिल्ह्याला वाढीव आवश्यक मतदान यंत्रे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

मध्यप्रदेश, हैदराबादमधून येणार नवीन यंत्रे
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा आयोजन होणार आहे. या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वापरलेली यंत्रे पुन्हा वापरता येणार नाहीत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदान यंत्रांची गरज भासणार आहे. राज्य निवडणूक आयोग मध्यप्रदेश आणि हैदराबादमधून नव्याने यंत्रे खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे वाढणार बॅलेट युनिटची संख्या
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकांसह महानगर पालिका निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांची संख्या वाढणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक बॅलेट युनिटची गरज भासणार आहे. आताच निवडणूक आयोगाने बॅलेट युनिटवर उमेदवारांचे छायाचित्र लावणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे एकाच बॅलेट युनिटवर (यंत्रावर) त्यातल्या गट, गणासह नगर पालिकेच्या प्रभागातील उमेदवारांची नावे टाकणे शक्य होणार नाही. यामुळे जिल्ह्यात आगामी निवडणुकांमध्ये यंत्रांची संख्या वाढणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...