Wednesday, May 22, 2024
Homeनगरझेडपी परीक्षेचे एका दिवसाचे वेळापत्रक जाहीर

झेडपी परीक्षेचे एका दिवसाचे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे वारंवार बदलणारे वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर झाले आहे. मात्र, यावेळी केवळ 1 नोव्हेंबर असे एका दिवसाचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहे. यातील सहा पदांसाठी मागील काही दिवसांपूर्वी लेखी परीक्षा झाल्यानंतर मध्येच पुढील परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले होते. दुसर्‍या टप्प्यातील 15 ते 23 ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. यातील 17 ऑक्टोबरपर्यंत पेपर झाले. परंतु मागील आठवड्यात अचानक पुढील परीक्षा रद्द होत असल्याचे परिक्षेसाठी नेमलेल्या खासगी कंपनीने कळवल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.

अवघ्या 19 संवर्गातील पदांसाठी सलग परीक्षा घेताना कंपनीचे नाकी नऊ आले असून प्रत्येक टप्प्यावर काहीतरी तांत्रिक कारण देत परीक्षेचा बोजवारा उडत आहे. दरम्यान, सोमवार (दि.23) रोजी पुढील परीक्षेचे वेळापत्रक आता जाहीर करण्यात आले आहे. यात 1 नोव्हेंबर रोजी जुनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक असे पेपर तीन पदांसाठी पेपर होणार आहेत. दरम्यान, इतर जिल्ह्यात दि. 2 व 6 नोव्हेंबरचेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र, नगर जिल्ह्यात अद्याप हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आधीच्या सहा आणि 1 नोव्हेंबरला तीन अशा 9 संवर्गासाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेविका महिला, आरोग्य सेवक पुरूष (50 टक्के हंगामी फवारणी कर्मचारी), प्रयोग शाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहायक, सहायक अभियंता, मुख्य सेविका-पर्यवेक्षीका (महिला बाल कल्याण विभाग), ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील पदे, औषध निर्माण अधिकारी आदी पदांच्या भरतीसाठी यथा अवकाश लेखी परीक्षांच्या तारखा कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या