Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजजिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक करणार - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक करणार – शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

सौंदाणे येथील जिल्हा परिषद शाळा इमारतीचे लोकार्पण

- Advertisement -

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

YouTube video player

गाव विकासाचा खरा पाया शिक्षणात आहे. अत्याधुनिक व सुसज्ज शाळा तसेच प्रेरणादायी शिक्षक मिळाले तर त्यांच्यातून डॉक्टर, अभियंता, अधिकारी व उद्योजक घडणार आहेत. यामुळे प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण व सोयी सुविधा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा चेहरा-मोहरा बदलला जाणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना केले.

तालुयातील सौदाणे येथे जिल्हा परिषद शाळा इमारतीचे लोकार्पण शिक्षण मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, विभागीय शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य अनिल गौतम, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, योजना शिक्षणाधिकारी सरोज जगताप, गट विकास अधिकारी विश्वास सावंत, गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील, तहसीलदार विशाल सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.

होतकरु व गोरगरिब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याबरोबरच आरोग्यालाही प्राधान्य देण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शाळेच्या नवीन इमारतीत सुसज्ज वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा, खेळाचे मैदान, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वॉटर फिल्टर आदी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबरोबर शाळेत स्वतंत्र अभ्यासिका, ई. सुविधा, सोलर यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी पुढे बोलतांना दिली.

किसान सुर्यवंशी यांच्या सौजन्याने वर्गखोल्या, पेव्हर ब्लॉक, शालेय प्रवेशद्वार, स्पोर्ट गणवेश, पाणी टाकी स्टँड, आदी सुविधा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांचा अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वांगिण विकास होवून आदर्श शाळा निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळणार्‍या शिक्षणाच्या माध्यमातून आपला सर्वांगिण विकासाबरोबरच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास साधावा. विज्ञान क्षेत्रात तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मेडीकल, इंजिनियरींग, आय. टी. आय व इतर क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करुन आपल्या कुटुंबांचे, गावाचे, तालुयाचे नव्हे तर जिल्ह्याचेही नाव मोठे करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी पुढे बोलतांना केले.

शाळा या ज्ञानमंदिर आहेत. यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे. प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत आहेत. यामुळे जिल्हा परिषद शाळेतील महत्व अधोरेखित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी स्पेलिंग बी, मॅथ बी, क्रीडा, सांस्कृतिक, स्काऊट गाईड आदी उपक्रमाबरोबरच मॉडेल स्कूलअंतर्गत मेळावे उपक्रम राबविले जात असल्याबद्दल मंत्री भुसे यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

आदर्श शाळा करण्यासाठी व विद्यार्थ्यांना आनंददाची व गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शिक्षकांनी कराव्यात. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत येण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकांशी समन्वय ठेवून शाळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही मंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना दिली.

जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाले आहे. खाजगी शाळेत मिळणार नाही, अशा सुविधा जिल्हा परिषद शाळेत मिळतात. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे. तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यास प्रतिसाद पाहता जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळाव्याचे आयोजित करण्यात येणार आहे.
ओमकार पवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...