Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाजिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना ( Zilla Parishad sports competitions) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व क्रीडा प्रशिक्षक अनिरुद्ध अथानी यांच्या उपस्थितीत उत्साहात सुरवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ठ संचलनासाठी अनुक्रमे निफाड, सुरगाणा, नाशिक पंचायत समिती यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.

- Advertisement -

स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी सारडा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीताचे सादरीकरण केले. यानंतर क्रीडा प्रशिक्षक अनिरुद्ध अथानी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ, दीपक चाटे यांनी दीपप्रज्वलन केले. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या पथकाने पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये ग्रेप काउंटी रिसोर्टच्या सौजन्याने अश्वसंचलन पार पडले. या अश्वसंचलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी केले. या संचलनानंतर भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिलिटरी बँड मार्चचे प्रात्यक्षिक दाखविले.

संचलनात बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवला पंचायत समिती, जिल्हा परिषद मुख्यालय या पथकांचा सहभाग होता. यापैकी उत्कृष्ठ संचलनासाठी अनुक्रमे निफाड, सुरगाणा, नाशिक पंचायत समिती यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी केले.प्रमुख पाहुणे अनिरुद्ध अथानी व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या