Friday, May 31, 2024
Homeनाशिकस्थायी समितीच्या जागेसाठी सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी, भाजपची रणनीती

स्थायी समितीच्या जागेसाठी सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी, भाजपची रणनीती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) रिक्त स्थायी समितीतील (Standing Comity) एका जागेसाठी सत्ताधारी शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने (Rashtravadi Congress) आपलाच सदस्य कसा बसेल यासा व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहता रिक्त जागा भाजपच्या कोट्यात येत असली तरी, ही जागा खेचून आणण्यासाठी दोन्ही पक्ष सरसावले आहे….

- Advertisement -

सभापतीपदाच्या निवडीच्या वेळी पदाचा आग्रह न धरता पदाचा त्याग केलेल्या सिध्दार्थ वनारसे (Sidharth Vanarase) यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून आग्रह राहणार हे निश्चित. त्यांच्यासाठी पक्षाबरोबरच सभापती संजय बनकर (Sanjay Bankar) हेही परतफेड करण्यासाठी आग्रही राहणार असल्याची चर्चा आहे.दुसरीकडे शिवसेनेचे दीपक शिरसाठ (Shivsena Deepak Shirsath) यांच्यासाठी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) स्वत: प्रयत्नशील असल्याचे समजते.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात (ऑफ लाईन)सभागृहात होत असल्याने या सभेत सदस्यांचा कार्यकाळ केवळ चार महिन्यांचा उरला असताना स्थायी समितीसह सर्व विषय समित्यांवरील रिक्त जागांवर सदस्य निवड करण्यात येणार आहे. या निवडीत महत्वाच्या असनाऱ्या स्थायी समिती सदस्य पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. अपक्ष यतिन कदम यांना भाजपचे सहयोगी म्हणून स्थायीवर संधी मिळाली होती. मात्र, कदम यांचा गट रद्द झाल्यामुळे त्यांचे सदस्यत्वही रद्द झाले आहे. जागा वाटपात ही जागा भाजपला असल्याने, रिक्त जागी भाजप सदस्यांची नेमणूक करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीने या जागेवर डोळा ठेवत, जागा खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पालकमंत्री तसेच आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यासाठी रणनीती सुरू असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आमदार बनकर यांचे समर्थक वनारसे यांचे नाव निश्चित करण्याची तयारी पक्षातंर्गत आहे. वनारसे यांच्यासाठी सभापती बनकर आग्रही आहेत. तर, शिवसेनेनेही या जागेसाठी प्रयत्न चालवले आहेत.अध्यक्ष क्षीरसागर यांनी या जागेसाठी हट्ट धरला असून शिरसाठ यांच्यासाठी त्यांनी पक्षातंर्गत प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या