Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाIND Vs ZIM T-20 Series : शेवटच्या सामन्यात झिंबाब्वे टीम इंडिया विरुद्ध...

IND Vs ZIM T-20 Series : शेवटच्या सामन्यात झिंबाब्वे टीम इंडिया विरुद्ध कमबॅक करणार?

हरारे | Harare

भारत विरुद्ध झिंबाब्वे क्रिकेट संघांमध्ये सध्या ५ टी २० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात १३ धावांनी पराभूत झाल्यानंतर शुभमन गिलच्या युवा भारतीय क्रिकेट संघाने सलग तीन सामन्यात विजय संपादन करून मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

आता पाचव्या सामन्यात विजय संपादन करून सलग चौथा विजय संपादन करण्याची संधी भारतीय क्रिकेट संघाकडे असणार आहे. तर झिंबाब्वे संघासाठी हा सामना म्हणजे एक औपचारिकता असणार आहे. अखेरच्या सामन्यात विजय संपादन करून मालिकेचा विजयी शेवट करण्यासाठी झिंबाब्वे क्रिकेट संघाचा प्रयत्न असणार आहे.

हे देखील वाचा : IND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सीक्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.हरारे येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी आणि गोलंदाजी करता अनुकूल आहे.या मैदानावर आतापर्यंत ४५ सामने खेळविण्यात आले असून, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या संघाने २६ सामन्यात विजय संपादन केला आहे.

रविवारी हवामान हरारे येथे चांगले राहणार असून, हवामान २० अंश सेल्सिअस राहील. सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. अखेरच्या सामन्यातील विजयाने आत्मविश्वास उंचावलेला भारतीय क्रिकेट संघ चौथ्या सामन्यातील ११ खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सलिल परांजपे नाशिक.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...