Friday, May 2, 2025
Homeधुळेसाक्री न्यायालयात धुळ्यातील दाम्पत्यामध्ये झोंबाझोंबी : गुन्हा दाखल

साक्री न्यायालयात धुळ्यातील दाम्पत्यामध्ये झोंबाझोंबी : गुन्हा दाखल

धुळे dhule। प्रतिनिधी

साक्री शहरातील न्यायालयाच्या (Court) ओट्यावर शुक्रवारी दुपारी अर्जदार आणि गैरअर्जदार असलेल्या धुळ्यातील दाम्पत्यामध्ये (couple) झोंबाझोंबी (Zombazombi) झाली. याप्रकरणी दोघांवर पोलिसात गुन्हा नोंद (Case registered) झाला आहे.

- Advertisement -

याबाबत एएसआय आशा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, न्यायालयाच्या ओट्यावर किशोर सुकदेव मलाहे (वय 40 रा. प्लॉट नं. 45 रा. साईबाबा नगर, साक्री रोड, धुळे) व सौ. सरोज किशोर महाले (वय 35 ह.मु जय शंकर लॉन्ड्री, बस थांब्यासमोर, साक्री) यांनी आपआपसात झोंबाझोंबी करून ऐकमेकांना शिवीगाळ व आरडाओरड करीत शांततेचा भंग केला.

दरम्यान दोघांचे भांडण पोहेकाँ साजीद सिंकदर, पोना सुनिल पवार, न्यायालयीन शिपाई आकाश बागुल, रूपेश सुर्वे व लिपीक भटू जगताप यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दाम्पत्यावर साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तपास पोहेकाँ रायते करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

धुळे तापले; पारा 44 अंशांवर

0
धुळे | प्रतिनिधी शहरात उष्णतेने कहर केला असून शुक्रवारी (2 मे) यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या...