Wednesday, May 29, 2024
Homeनगरजि. प. सीईओंच्या नावे सोशल मीडियावर बनावट खात

जि. प. सीईओंच्या नावे सोशल मीडियावर बनावट खात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह इतर काही अधिकार्‍यांच्या नावे सोशल मीडियावर बनावट खाते उघडून जनतेला पैशाची मागणी किंंवा इतर मदत मागण्यांचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशा तोतयांपासून सावध राहण्याचे आवाहन सीईओ येरेकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक, तोतया इसम हे सामाजिक माध्यमाचा (सोशल मीडिया) गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या व अशा अनेक सामाजिक माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे, तसेच जिल्हा परिषदेच्या इतर अधिकार्‍यांचे बनावट खाते निर्माण करून त्याव्दारे सामान्य जनतेला पैशाची मागणी करणे, वैद्यकीय मदत मागणे किंवा सैन्य दलातील मित्र आजारी आहे त्याला मदत करणे, असे भावनिक संदेश टाकून त्यासाठी आर्थिक मागणी केली जात आहे.

अशा अनेक प्रकारच्या बनावट घटना घडत असल्याबाबत जिल्हा परिषदेकडे माहिती आली आहे. तरी अशा प्रकारच्या कोणत्याही सामाजिक माध्यमाच्या संदेशाच्या प्रलोभनास बळी पडून आपले नुकसान करून घेऊ नये. तसेच अशा कोणत्याही बनावट खात्याशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा संबंध नाही. त्यामुळे याबाबत सर्व नागरिक व जिल्हा परिषद कर्मचार्‍यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या