Friday, May 1, 2026
HomeराजकीयZP Election Result: सोशल मीडियावर लोकप्रिय, पण निवडणुकीच्या मैदानात अपयश; माजी सरपंच...

ZP Election Result: सोशल मीडियावर लोकप्रिय, पण निवडणुकीच्या मैदानात अपयश; माजी सरपंच निर्मला नवलेंचा धक्कादायक पराभव

शिरुर | Shirur
सोशल मिडीयावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांचा मनीषा पाचंगे यांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे प्रसिद्ध आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामे आणि बोलण्याच्या शैलीमुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांना आपले मत टाकले आहे.

- Advertisement -

ZP Election Results: सतेज पाटलांचा जिल्हा परिषदेच्या आखाड्यात शड्डू, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी

निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. आजवर त्यांचे अनेक रिल्स आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. निर्मला नवले यांची स्टाईल आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे व कृतीचे त्यांच्या चाहत्यांना अप्रूप असते. त्यामुळे त्यांच्या रिल्स सोशल मिडीयावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. मात्र, यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चालू शकली नाही. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा २७०० मतांनी पराभव केला आहे.

निर्मला नवले यांचे ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांचा रेज रोव्हर मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणारा व्हिडीओ बराच गाजला होता. आयटी इंजीनिअर असलेल्या निर्मला या सरपंच झाल्यानंतर उच्चशिक्षित सरपंच असे त्यांचे कौतुक केले जात होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती आणि त्या जिंकूनही आल्या होत्या. मात्र यावेळेस त्यांचा पराभव होऊन जिल्हा परिषदेची संधी हुकली आहे.

ताज्या बातम्या

LPG cylinder price hike : सर्वसामान्यांना मोठा झटका! LPG सिलिंडरच्या दरात...

0
मुंबई । Mumbai मे महिन्याची सुरुवात होताच कडक उन्हाच्या झळांसोबतच आता महागाईच्या झळांनीही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशातील आघाडीच्या तेल विपणन कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL)...