Tuesday, May 7, 2024
Homeजळगावजि.प.,पं.स. निवडणुकीत युवकांना प्राधान्य!

जि.प.,पं.स. निवडणुकीत युवकांना प्राधान्य!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकीत (elections) युवकांना (Youth) पक्षातर्फे प्राधान्य देण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे (NCP Youth Congress) प्रदेशाध्यक्ष (State President) मेहबूब शेख (Mehboob Sheikh) यांनी केली. शरद युवा संवाद यात्रेनिमित्त (Autumn Youth Dialogue Journey) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील,महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक, युवक सरचिटणीस ललित बागुल, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष (President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) यांच्या संकल्पनेतून या शरद संवाद यात्रेचा शुभारंभ झाला आहे. यावेळी जळगाव, नंदुरबार व धुळे या तीनही जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या यात्रेअंतर्गत युवा पिढीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित केले जाणार आहे. याचबरोबर जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ज्यामध्ये युवकांचादेखील (Youth) सहभाग आहे. अशा वेळेस जळगाव जिल्ह्यातील मोठा तरुण राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडला जाणार आहे, असही त्यांनी सांगितले.

कोरोनामुळे पुढे ढकलली शरद संवाद यात्रा

शेख यावेळी बोलताना म्हणाले की खरं म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये शरद संवाद यात्रेचा शुभारंभ होणार होता. मात्र. कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही शरद संवाद यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. आता यात्रेला प्रारंभ झालेला असून या संवाद यात्रेदरम्यान (Dialog trips) कोरोनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या