Friday, November 22, 2024
Homeधुळेएटीएम पळविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

एटीएम पळविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी; तिघांना बेड्या: खंबाळेतून क्रुझर जप्त

धुळे | प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे वाहनाव्दारे एटीएम ओढून ते पळविण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा शिरपूर तालुका पोलिसांनी पदार्फाश केला आहे. टोळीतील तिन जणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले क्रुझर वाहन जप्त करण्यात आले आहे.

बोराडी गावातील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे एटीएम पाच चोरट्यांनी क्रुझर वाहनला दोरी बांधून कॅबीनच्या बाहेर ओढून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरमालक व काही ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आल्याने आरडाओरड केल्याने चोरटे एटीएम मशीन सोडून पसार झाले होते. दि.१९ जुलै रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली होती.याबाबत इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्विसेसचे मॅनेजर प्रवीण पाठक यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

वेगवेगळ्या टीमकडून शोध सुरू- वरिष्ठांच्या सुचनेनुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी चोरट्यांच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या. या टीमकरून शिरपूर तालुका व महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमावर्ती भागात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला.

खंबाळेत आढळली क्रुझर- तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलेली आणि चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली क्रुझर गाडीची मिळतेजुळते वर्णन असलेली एक गाडी खंबाळे या गावी असल्याची गोपनीय माहिती बीटचे अंमलदार कैलास जाधव व मनोज नेरकर यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक हिरे यांच्या आदेशावरून गाडी मालक मगन पवार यांना गाडीसह पोलीस ठाण्यात आणले.

मुलाने दिली गुन्ह्याची कबुली- गाडी मालक मगन पवार याने विचारपूस केली असता पवार यांनी, रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत धुळे किंवा जळगाव येथील रेल्वे स्टेशनला रेल्वे वॅगनवरील गोणी उतरवण्याकरीता माझे क्रूझर गाडीत मजुर घेऊन जात असतो. तसेच मुलगा योगेश हा कधीतरी गाडी वापरतो, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गाडी मालक पवार यांचा मुलगा योगेश यास पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला होता एटीएम फोडण्याचा प्लॅन- चौकशीत योगेश पवार याने मित्र अनिल याने आपल्याला ऊसतोडीसाठी मजूर शोधत आलेल्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करायची आहे, तू गाडी घेऊन हाडाखेड येथे ये असे फोन करून सांगितले. त्यावरून योगेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन हाडाखेड येथे आला असता अनिलने अजून दोन मुलांना माझ्या क्रुझर गाडीत बसवून घेतले. त्यानंतर आम्ही लौकी मार्गे बोराडी येथे गेलो. तेथे आम्ही एसबीआय बँकेचे एमटीएम माझ्या क्रुझर गाडीच्या सहाय्याने दोर लावून कॅबीनमधुन खाली ओढले. उचलून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही ग्रामस्थांनी आम्हाला पाहिल्याने आम्ही तेथून पळ काढला, अशी कबुली योगेश पवार याने दिली.

तीन जणांना अटक- पोलिसांनी आतापर्यंत गुन्ह्यात सहभागी असलेल्या सहा आरोपींपैकी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची ओळख परेड बाकी असल्याने त्यांना बुरखा घालून न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. तर एका आरोपीची प्रकृती बरी नसल्याने त्याची न्यास न्यायालयीन कोठडी मिळाली.

या पथकाची कामगिरी- गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ असई कैलास जाधव पोहेका संतोष पाटील, पोहेकॉ राजु ढिसले, पोहेकॉ संदिप ठाकरे, पोहेकॉ अनिल चौधरी, पोकॉ संजय भोई, योगेश मोरे, मनोज नेरकर, भुषण पाटील, स्वप्निल बांगर, सागर कासार यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या