जिल्ह्यातून सहा उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जळगाव शहर विधानसभेसाठी आज दुसर्या दिवशी बुधवार २३ रोजी २० जणांनी ४२ उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली. तर विविध उपविभागीय कार्यालय स्तरावरून देखील आज मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज नेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जळगाव शहर विधानसभा क्षेत्रात बुधवारी २० जणांनी ४२ अर्ज नेले असून आज दुसर्या दिवसा अखेर ३ वाजेपर्यंत एकूण ४६ जणांनी ८७ नामांकन अर्ज नेले आहेत. यात गोकूळ चव्हाण अपक्ष१, सीमा सुरेश भोळे यांच्यातर्फे अतुल खांडेकर अपक्ष१, नरेंद्रकुमार बोरसे यांनी विष्णू रामदास भंगाळे उबाठा १, प्रफूल्ल सरोदे यांनी विष्णू रामदास भंगाळे यांच्यासाठी अपक्ष १, गणेश चौधरी यांनी प्रभाकर गोटू सोनवणे यांच्यासाठी अपक्ष १, मुश्ताक अहमद यांनी अब्दूल अजीज अबुह मजिद सालार अपक्ष २, विष्णू घोडेस्वार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३, प्रा.डॉ.आशिष जाधव हिंदूस्थान जनता पार्टी ४, सुरेश पांडूरंग पाटील पाचोरा राष्ट्रीय विकास काँग्रेस पार्टी २, प्रविण चौधरी निर्भय महाराष्ट्र पक्ष ४, सै.फारूक सै.गफार अपक्ष २, सागर प्रकाश पाटील मनसे ४, परेवज मेहमूद शाह यांनी लिना अनुज पाटील यांच्यासाठी मनसे ४, प्रमोद बळीराम पाटील अपक्ष ४, सुनिल शंकर सोनवणे यांनी मंगला सुनिल सोनवणे यांच्यासाठी बहुजन समाज पार्टी २, अशोक सोनवणे अपक्ष २, मोहंमद अक्रम राजू देशमुख अपक्ष २, राजेंद्र दगडू सपकाळे गुलाब चुडामण पाटील यांच्यासाठी अपक्ष २, सुभाष बाबाराव मेढे अपक्ष १, आणि राजेंद्र पंडित सुरवाडे यांनी शैलजा राजेश सुरवाडे यांच्या साठी बहुजन समाज पार्टी २ असे २० जणांनी ४२ उमेदवारी अर्ज नेले आहेत.
सहा अर्ज दाखल
जळगाव जिल्ह्यातून विधानसभेसाठी जळगाव शहर, एरंडोल, जामनेर आणि मुक्ताईनगर या मतदारसंघांमधून सहा उमेदवारांचे सहा अर्ज दाखल झाले आहे. अनेक इच्छुक उमेदवार हे सोमवारी वसुबारसचा मुहूर्त साधून अर्ज भरणार आहेत. भाजपाचे आमदार राजूमामा भोळे हे दि. २८ रोजी जळगाव शहर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.