Tuesday, October 22, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात दरोडा टाकण्याचा प्रयत्न, साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा...

नंदुरबारात दरोडा टाकण्याचा प्रयत्न, साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा दोघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्यावर काल रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, दोन जण अंधाराचा फायदा घेवून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून ११ लाख ६६ हजार ४८० हजाराच्या सोनेचांदीच्या दागिन्यांसह पिस्टल, गुप्ती, मिरचीपुड, दोरी लोखंडी पोपट पाना असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२ ऑक्टोबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास जोगिंदरसिंग बचणसिंग शिकलीकर (वय ३२ वर्ष), इम्रान दिलवर शेख (वय १९ वर्ष दोन्ही रा.सोरापाडा ता.अक्कलकुवा) निशानसिंग रतनसिंग शिकलीकर (वय ३१ रा.एकता नगर नंदुरबार, ह.मु.बी.आर.सी. गेट उधना सुरत गुजरात,

- Advertisement -

सुमित पाडवी व एक अनोळखी इसम हे नंंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्यावर कोठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीने जात होते. यातील जोगिंदरसिंग शिकलीकर व इम्रान शेख यांच्या ताब्यात एकुण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तर अन्य दोघ अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.

त्यांच्याकडे एक देशी बनावटीची लोखंडी पिस्तल, २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राऊंड,५०० रुपये किंमतीची लोखंडी गुप्ती, १०० रुपयांची एक पांढर्‍या रंगाची सुती, मिरचीची पुड असलेली प्लास्टीकची पिशवी, ३६ हजार ४०० रुपयांची रोकड, त्यात चलनातून बंद करण्यात आलेल्या दोन हजाराच्या दोन नोटा,

१५ हजार रुपये किंमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल फोन, १०० रुपये किंमतीचे कडीकोयंडा तोडण्याकरीता वापरण्यात येणारे लोखंडी साहित्य, १५ हजार रुपयांचा टेक्नोस्पार्क कंपनीचा मोबाईल फोन, ५० रुपयांची अंबुर, २ लाख ८७ हजार ७०० रुपयांचे ४१.१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक मणी मंगळसुत्र, १ लाख १४ हजार ७३० रुपयांचे १६.३९० ग्रॅम वजनाची सोन्याची रस्सी चैन,

१ लाख ५४ हजार २१०रुपयांची २२.०३० ग्रॅम वजनाच्या ५ नग सोन्याच्या अंगठया, १ लाख २६ हजार ५६० रुपयांचे १०.०८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ०४ जोड कानातले, ३ हजार २९० रुपयांची ०.७४० ग्रॅम वजनाची सोन्याची ०१ जोड कानातील बुटी, ५१ हजार ५२० रुपयांचे ७.३६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे एक जोड कानातील काप,

१ लाख २ हजार ७६० रुपयांचा १४.६८० ग्रॅम वजनाचा सोन्याचे एक गळयातील प्लेन नेकलेस, ८१ हजार ९०० रुपयांचा ११.७०० ग्रॅम वजनाचा डायमंड असलेला गळयातील नेकलेस, ९५ हजार ९०० रुपयाचे १३,७०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, १४ हजार रुपयांचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे २ शिक्के, ८ हजार ८२० रुपयांचे १.२६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, ३० हजार ९४० रुपयांचे ४.४२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नग सोन्याचे मनी असा एकुण ११ लाख ६६ हजार ४८० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व पिस्टल, गुप्ती, मिरचीपुड, दोरी लोखंडी पोपट पाना असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


याबाबत पोलीस शिपाई अभय राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या