Thursday, June 18, 2026
Homeक्राईमNashik MC Election : निवडणूक प्रचार भरकटला! सोशल मीडियावरील मॉर्फ व्हिडीओंचा काही...

Nashik MC Election : निवडणूक प्रचार भरकटला! सोशल मीडियावरील मॉर्फ व्हिडीओंचा काही उमेदवारांना फटका

दळवीपाठोपाठ वावरेवर गुन्हा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

महानगरपालिका निवडणुकीच्या (NMC Election) प्रचारात एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी सोशल मिडीया (Social Media) गैरवापर व अतिरेक आता उमेदवारांनाच अडचणीत आणू लागला आहे. मॉर्फ व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आता भद्रकाली पोलिस ठाण्यातही अशाच स्वरूपाचा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी भाजपचे नेते व माजी महापौर विनायक पाडे (Vinayak Pandey) यांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

तक्रारीवरून पोलिसांनी संशयित श्रीकांत वावरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका मॉर्फ व्हिडीओमुळे आपली व कुटुंबीयांची बदनामी झाल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. निवडणुकीसाठी तिकीट वाटप सुरू होण्यापूर्वी विनायक पांडे यांनी शिवसेना (उबाठा) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आणि वाद झाला होता. मात्र, भाजपने (BJP) पांडे यांच्यासह शाहू खैरे व अॅड. यतीन वाघ यांना उमेदवारी दिली. विनायक पांडे स्वतः निवडणूक रिंगणात नसले, तरी त्यांची सून आदिती ऋतुराज पांडे प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढवत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Municipal Corporation Election : ‘वारसां’ना किती मिळणार मतदारांची ‘पसंती’?

मंगळवारी (दि. ६) विनायक पांडे यांना सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह व्हिडीओची माहिती मिळाली. कार्यकर्ता सदेश फुले याने संबंधित व्हिडीओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. ‘भद्रकाली व्यापारी संघटना व रहिवाशी संघटना’ या ग्रुपचे सदस्य असलेल्या पांडे यांनी व्हिडीओची खात्री केली. या व्हिडीओमध्ये खंडणी, एमडी ड्रग्ज आणि हप्ते वसुलीतून मिळालेल्या पैशांचा (Money) संबंध उमेदवाराच्या सासऱ्यांशी जोडण्यात आला. ही पोस्ट व मजकूर पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे लक्षात येताच पांडे यांनी भद्रकाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी श्रीकांत वावरे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे करीत आहेत.

सलग दुसरा गुन्हा

मॉर्फ व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी शहरात दाखल झालेला हा सलग दुसरा गुन्हा आहे. यापूर्वी अंबड पोलिस ठाण्यात भाजपचे माजी नगरसेवक व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनीही अशाच प्रकारे बदनामी झाल्याची तक्रार दाखल केली होती. मॉर्फ व्हिडीओ अथवा बदनामीकारक मजकुराबाबत फिर्याद आल्यास गुन्हा दाखल केला जातो. शक्य असल्यास संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरून हटविण्याची कार्यवाहीही केली जाते. असे बदनामीकारक मजकूर प्रसारित करु नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न

0
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi महिलेवर चाकूने वार करुन अत्याचाराचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली...