Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज करणार शक्तीप्रदर्शन

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज करणार शक्तीप्रदर्शन

महायुतीतर्फे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव : राज्यातील लक्षवेधी लढत मानल्या जाणार्‍या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-रिपाई महायुतीतर्फे ना.गुलाबराव पाटील दि. २४ रोजी निवडणूक नामनिर्देश अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव ग्रामीणच्या महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे विद्यमान आमदार व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा निवडणुच्या रिंगणात उतरले आहेत. ना. गुलाबराव पाटील दि.२४ रोजी सकाळी १०.०० वाजता धरणगाव येथे निवडणूक नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी महायुतीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावेळी मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजता धरणगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, शिवसेना जिल्हध्यक्ष निलेश पाटील, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील, भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे , रॉ.कॉ. चे रमेश बापू पाटील व सेनेचे संजय पाटील सर, भाजप तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण पाटील तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...