Thursday, May 15, 2025
Homeधुळेबनावट रासायनिक खतांची विक्री रोखली; दोन गोडाऊनवर छापा

बनावट रासायनिक खतांची विक्री रोखली; दोन गोडाऊनवर छापा

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त: निजामपुर पोलिसांची दमदार कारवाई

- Advertisement -

निजामपूर (वार्ताहर)- येथील पोलिसांनी गावोगावी होणार असणारी बनावट रासायनिक खतांची विक्री रोखत दमदार कारवाई केली. वाहन व ७५ हजार ६०० रुपसे किंमतीचा बनावट खतांचा साठा जप्त केला. याप्रकरणी मॉर्केटर मे. एस. आर. फर्टीलायझर अँण्ड केमीकल्स वर्धानेचे (ता. साक्री) प्रो.प्रा. राजु भटु राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी कृषी विभागाच्या पथकाला सोबत घेत राठोड यांच्या साक्री व वर्धानेतील गोडाऊनमध्ये छापा टाकला. तेथून एकुण २४ लाख ९८ हजार १५ रुपये किंमतीचे रासायनिक खते व किटकनाशक संशयीतरित्या आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपुर पोलीस ठाण्याचे सपोनि मयुर भामरे, पोहेकॉ नारायण माळचे, पोकॉ दिपक महाले, राकेश महाले, मुकेश दुरगुडे, गौतम अहिरे तसेच जिल्हा कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय तंत्र अधिकारी उल्हास ठाकुर, जि. प.कृषी विभागाचे मोहीम अधिकारी प्रदिपराव निकम, साक्री तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, साक्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.एम. नेतनराव यांच्या पथकाने संयुक्तपणे केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...