Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याभावली धरण ओव्हर फ्लो

भावली धरण ओव्हर फ्लो

जाकीर शेख | घोटी Ghoti

इगतपुरी तालुक्याची ( Igatpuri Taluka ) पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या व सिंचनाचे प्रश्न सोडविणाऱ्या दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या एक हजार तीनशे एकोणपन्नास दलघफू साठवण क्षमता असणारे भावली धरण ( Bhavli Dam ) पूर्ण क्षमतेने भरून ओसांडून वाहु लागले आहे.

- Advertisement -

या बातमीने तालुका सुखावला असून सतत सुरू झालेल्या पावसामुळेच हे धरण भरल्याने भावना व्यक्त होत आहेत दरम्यान दि १४ रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान भावली धरण ओहरफलो झाले आहे. तर धरणातून ९४८ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच इगतपुरी तालुक्याने सरासरी कडे वाटचाल सुरू केली असून जवळपास अर्धशतक देखील गाठले आहे.

तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली असून महत्वाचे समजले जाणारे दारणा धरणही भरण्याच्या मार्गावर असून,या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे येत्या चार पाच दिवस पावसाने मेहेरबानी कायम ठेवली तर दारणा धरण सुद्धा लवकरच भरेल.

मागील दहा दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने अद्यापही इगतपुरी तालुक्यात उसंत न दिल्याने समाधानकारक होणाऱ्या पावसाने तालुक्यातील धरण साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे तालुक्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीची ५० टक्के पाऊस आतापर्यंत झाला असून,या वर्षी पाऊस सरासरी ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.आज ता १५ पर्यंत १ हजार ८८८ मिलीमीटर पाऊस झाल्याने तालुक्यातील धरण साठ्यात भरमसाठ वाढ झाली असून यातील भावली धरण पूर्णपणे ओव्हर फ्लो झाले आहे दरम्यान दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे .

दारणा नदीच्या उगमस्थानी बांधण्यात आलेले भावली धरणातील पाणीसाठा दारणा धरणात सोडून पुढे जायकवाडीला सोडण्यात येतो.तसेच संपूर्ण तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची मदार या धरणावर आहे यामुळे मागील काही महिन्यात या धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग केल्याने .या धरणाने तळ गाठला होता दारणा नदीलगतच्या गावातील पिण्याच्या पाण्याची सिंचनाची भिस्त या धरणावर असल्याने सर्व जण हे धरण भरण्याच्या प्रतीक्षेत होते तर भाम तसेच दारणा धरणही आता लवकरच भरण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या वर्षी हे धरण २५ जुलै रोजी भरले होते तर यावर्षी दहा दिवस आधीच हे धरण भरले आहे उशिरा पाऊस सुरु होऊनही धरण लवकर भरल्याची किमया वरुणराजाने साधली यावरून या भागात पावसाचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो.आता मात्र या भागातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या