Saturday, November 23, 2024
Homeजळगाववसतिगृहाच्या शुल्कात १५ टक्के कपात

वसतिगृहाच्या शुल्कात १५ टक्के कपात

विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनामुळे व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

जळगाव दि.१९ (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी सुचविण्यात आलेली ३० टक्के शुल्कवाढ कमी करून १५ टक्के करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या एका वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखड्यातील शिफारशींना देखील व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर झालेल्या अधिसभेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेची आणि त्यानंतर अधिसभेची बैठक झाली. सन २०२५-२६ या एका वर्षाचा विद्यापीठाचा बृहत आराखडा मान्य करून शासनाकडे सादर करण्याकरीता या बैठका घेण्यात आल्या. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या बृहत आराखड्यावर चर्चा झाली. नवीन महाविद्यालयांसाठी स्थान निश्चित केलेले ५८ स्थळबिंदुसह अधिष्ठाता मंडळाने तयार केलेल्या या बृहत आराखड्यात ज्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्याला व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.विद्यापीठ कॅम्पसवरील विद्यार्थी / विद्यार्थिंनींच्या वसतिगृह शुल्कात याशैक्षणिक वर्षापासून ३० टक्के दरवाढ करण्यात आली. वसतिगृह व्यवस्थापन समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने ही दरवाढ करण्यात आली होती. काही विद्यार्थी संघटनांनी ही शुल्कवाढ मागे घेण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये या मागणीवर चर्चा झाली आणि ३० टक्के ऐवजी १५% शुल्कवाढीला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.
बृहत आराखड्याला अधिसभेची मान्यता
व्यवस्थापन परिषदेने बृहत आराखड्याला मान्यता दिल्यानंतर अंतीम मंजूरीसाठी अधिसभे समोर आराखडा मांडण्यात आला. कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली. व्यवस्थापन परिषदेने केलेल्या शिफारशींसह या आराखड्याला अधिसभेने मान्यता दिली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रा.एकनाथ नेहते, प्रा. धिरज वैष्णव, निशांत रंधे, डॉ. मंदा गावीत, नितीन ठाकूर आदींनी भाग घेतला.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा.साहेबराव भुकन, प्रा.म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा.शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा.योगेश पाटील उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या