Saturday, April 26, 2025
Homeक्राईमविष प्राशन केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

कौटुंबिक वादातून घडली घटना

जळगाव – करमाळ येथे सासरी गावात कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात विषारी औषध घेतल्याने उमाळा येथील ४० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिनकर तुळशीराम पाटील वय ४० रा. उमाळा ता. जळगाव ह.मु. कवली ता. सोयगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील उमाळा येथील रहिवाशी दिनकर तुळशीराम पाटील वय-४० हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह सोयगाव तालुक्यातील कवली गावात वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दिनकर पाटील हे पत्नी व मुलांसोबत सासरी करमाळ ता. जामनेर येथे सासरी आलेले होते. त्यावेळी पती व पत्नीत वाद झाला होता. ही माहिती दिनकर पाटील यांनी पुतण्या मनोहर पाटील याला सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा पतीपत्नीत वाद झाल्याने संतापाच्या भरात त्यांनी सासरी करमाळ येथे विषारी औषध घेतले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. काकूच्या वादामुळेत काकाने विषारी औषध घेतल्याची माहिती मयत दिनकर पाटील यांचे पुतणे मनोहर पाटील रा. उमाळा यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...