Sunday, September 8, 2024
Homeक्राईमशहादा येथे पावणे चार लाखांची घरफोडी, सोन्या चांदीचे दागिने लंपास

शहादा येथे पावणे चार लाखांची घरफोडी, सोन्या चांदीचे दागिने लंपास

नंदुरबार | दि.12| प्रतिनिधी

शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरातून ३ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली.

- Advertisement -


याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.९ ते १० जुलैदरम्यान शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील रहिवासी सॉफ्टवेअर इंजिनिअर शाहरुख शहागीर मन्सुरी यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील ५४ हजार रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची धातुची गळयातील पोत,

१ लाख ५ हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम गळयातील पोत, ५१ हजार रुपये किमतीची १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ७५ हजार रुपये किमतीचा २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ३० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग, २१ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके,

१८ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे कानातील काप, १२ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची एक अंगठी, ६ हजार रुपये किमतीचे १५ तोळे चांदीची पायल असा एकुण ३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला.

तसेच बेडरुममधील लाकडी प्लायवूडचे कपाट तोडुन त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकुन किचन रुम मधील ३ लोखंडी पेटयाचे कुलूप व कडी कोंडा तोडुन त्यात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. याबाबत शाहरुख मन्सुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या