Thursday, November 21, 2024
Homeजळगावसंधी शोधावी लागते, ती चालून येत नाही!

संधी शोधावी लागते, ती चालून येत नाही!

युवारंगच्या उद्घाटनप्रसंगी दिग्दर्शक शिवाजी पाटील यांचे मत

जळगाव. दि.२४ (प्रतिनिधी) कलेच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संधी शोधावी लागते. ती चालून येत नाही. प्रसंगी संघर्षही करावा लागतो. त्यामुळे या क्षेत्रात अगोदर परिपूर्ण व्हा, झोकून देण्याची तयारी ठेवा, प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभागाव्दारा आयोजित युवारंग युवक महोत्सव आणि दिव्यांग महोत्सवाचे उद्घाटन करतांना श्री. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे विद्यार्थी विकास समन्वय समितीचे अध्यक्ष तथा व्य.प.सदस्य नितीन झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. साहेबराव भूकन, प्रा. शिवाजी पाटील, प्रा.सुरेखा पालवे, डॉ. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांची उपस्थिती होती.
महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे यांनी मनोगतात पूण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जन्मशताब्दीमुळे स्त्री सक्षमीकरण ही थीम या महोत्सवात ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. अहिल्यादेवींनी सुराज्य, शासन व्यवस्था उत्तमरित्या विकसित केली आणि खर्‍या अर्थाने स्त्री सक्षमीकरण केले असेही ते म्हणाले.
युवकमहोत्सवातून अभिव्यक्तीची संधी- कुलगुरू
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी नवसृजनेतेच्या या वयात तरुणांना अभिव्यक्तीची गरज असते आणि युवक महोत्सवाच्या माध्यमातून ती संधी तरुण पिढीला मिळत असते. त्याचा फायदा त्यांनी घ्यावा असे आवाहन केले. आपल्या भाषणाची सुरुवात प्रा.माहेश्वरी यांनी, हर फैसला नही होता सिक्का उछालके, यह दिल का मामला है जरा संभालके, इस मोबाईलके जमाने के इनको क्या मालूम, हम खत मे रख दिया करते थे दिल निकाल के हा शेर सादर केला.
कार्यक्रमाच्या सुरुवात राज्यगीत, विद्यापीठ गीत व युवक महोत्सव गीताने झाली. सूत्रसंचालन डॉ. जी.ए.उस्मानी, प्रा.योगिता चौधरी व प्रा.विद्या पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ.जगदीश पाटील, अधिसभा सदस्य डॉ. राजेश जवळेकर, डॉ.दिनेश पाटील, प्रा. आशुतोष पाटील, प्राचार्य एस.एन.भारंबे, डॉ.धीरज वैष्णव, प्रा. संदीप नेरकर, प्रा.गजानन पाटील, प्रा. मंदा गावीत, अमोल मराठे, अमोल सोनवणे, दिनेश चव्हाण, स्वप्नाली महाजन, नितीन ठाकूर, भानुदास येवलेकर, दीपक पाटील, सुरेखा पाटील, ऋषीकेश चित्तम उपस्थित होते.
आजचे कार्यक्रम
उद्या शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता मिमिक्री, दुपारी १ वाजा मूकअभिनय, सकाळी ८.३० वाजता वक्तृत्व, भारतीय समुह गान, स्वरवाद्य, दुपारी १ वाजता तालवाद्य, सयंकाळी ४ वाजता शास्त्रीय गायन, स्पॉट पेंटींग, दुपारी १ वाजता व्यंगचित्र, सायंकाळी ४ वाजता कोलाज या स्पर्धा होणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या