Thursday, January 8, 2026
Homeक्राईमसोन्याची बनावट मण्यांची माळा देवून पाच लाखांची रोकड हडपली, तळोदा येथील दाम्पत्याची...

सोन्याची बनावट मण्यांची माळा देवून पाच लाखांची रोकड हडपली, तळोदा येथील दाम्पत्याची फसवणूक

नंदुरबार | दि.4| प्रतिनिधी

तळोदा येथील भाजीपाला व्यवसाय करणार्‍या दाम्पत्याची दोन अनोळखी इसमांनी पाच लाखांत फसवणूक केल्याची घटना घडली. या इसमांनी पाच लाखाची रोकड घेवून त्यांना बनावट सोन्याची माळा देवून फसवणूक केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१६ ऑगस्ट रोजी अशोक झावरु गवळे व त्याची पत्नी सुरेखाबाई हे तळोदा येथील भन्साली प्लाझा समोरील त्यांच्या भाजीपाला दुकानात असतांना दोन अनोळखी इसमांनी वारंवार भाजीपाला घेवून गवळे यांच्याशी ओळख निर्माण केली.

YouTube video player

दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी तळोदा येथे पुन्हा या दोन्ही इसमांनी गवळे यांच्या भाजीपाला दुकानावर येवून ‘मेरी बिवी और लडकी की तबीयत बहोत खराब हो गयी है उनको ईलाज के लिए धुलिया लेके जाने का है, मेरे पास अस्पताल के लिए पैसे नही’ है असे बोलुन सहानुभुती मिळवली व दवाखान्याच्या कामासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली.

त्या बदल्यात ‘हमारे पास तुम्हारे लिए पाच लाख रुपये से ज्यादा किमत के सोने के गहने है, वो सोने के गहने लेने के लिए तुमको धुलिया के सरकारी अस्पताल को आना पड़ेगा’ असे सांगुन सोन्याचा मणी देवून दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी रोख रुपये २१ हजार घेवून गेले.

नंतर दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी धुळे येथील सरकारी दवाखना हिरे मेडीकल कॉलेज येथे बोलावून त्या ठिकाणी गवळे यांच्याकडून रोख रुपये ५ लाख रुपये घेवून त्यांना बनावट सोन्याच्या मणीच्या माळा देवून फसवणुक केली.

याबाबत अशोक गवळे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश निकम करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...