Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील प्रकल्प साठ्यांत २५ दिवसात १०% वाढ

जिल्ह्यातील प्रकल्प साठ्यांत २५ दिवसात १०% वाढ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील 3 मोठ्या प्रकल्पांसह लघु-मध्यम अशा 96 प्रकल्पात सद्यस्थितीत 48.30 % उपयुक्त जलसाठा असून गेल्या एक जुलै रोजी 554.26 दलघमी म्हणजे 19.57 टीएमसी म्हणजेच 38.83 % उपयुक्त साठा होता. जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे पंचवीस दिवसात जिल्ह्यातील जलसाठ्यात सरासरी दहा टक्के वाढ झाली असून, गतवर्षी याच दिवशी केवळ 178 वन 64 दलघमी म्हणजेच 6.31टीएमसी सह 12. 51% उपयुक्त जलसाठा होता.

- Advertisement -

पाच दिवसात 6% पाणी साठ्यात झाली वाढ

गत सप्ताहात 22जुलै रोजी हतनुर 47.दलघमी सह 1.66टीएमसी, म्हणजेच 18.43%, गिरणा 201.62,दलघमी, 7.12 टीएमसी म्हणजेच 36.51%, तर वाघूर 195.93 दलघमी, 6.92 टीएमसी म्हणजेच 78.83% उपयुक्त साठा होता. झालेल्या पावसामुळे पाचच दिवसात जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात सरासरी 8 ते 10% वाढ पाणीसाठ्यात झाली आहे. 26 जुलै रोजी सद्यस्थितीत हतनुर 47.दलघमीसह 1.66 टीएमसी, म्हणजेच 18.43%, गिरणा 222.48 दलघमी, 7.46 टीएमसी म्हणजेच 42.49%, तर वाघूर 205 .68 दलघमी, 7.26 टीएमसी म्हणजेच 82.78 % उपयुक्त साठा असून जिल्ह्यातील 96 प्रकल्पात 689.52 दलघमी, 25.35 टीएमसीसह 48.40% उपलब्ध पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गतवर्षी याच दिवशी जिल्ह्यात सर्व प्रकल्पात 178.64 दलघमी, 6.31 टीएमसीसह 12.51% उपयुक्त जलसाठा शिल्लक असल्याचे प्रशासनाने दिलेल्या नोंदीत म्हटले आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सुन पुर्व तसेच मान्सून पावसाने बर्यापैकी कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पा पैकी एक जुलै रोजी हतनुर प्रकल्पात 17.73, गिरणा 35.09, तर वाघूर 74.24% सह मध्यम लघु प्रकल्पात 554.26 दलघमी 19.57 टीएमसी सह 38.83% उपयुक्त जलसाठा होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या