अहमदनगर – जिल्ह्यात आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
आज जिल्ह्यातील ५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. सध्या एकूण नोंद रुग्ण संख्या ५१० इतकी झाली आहे.