Wednesday, February 4, 2026
HomeनगरDeputy Tehsildar transfer : जिल्ह्यातील ११ नायब तहसीलदारांच्या बदल्या

Deputy Tehsildar transfer : जिल्ह्यातील ११ नायब तहसीलदारांच्या बदल्या

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

दोन वर्षांपासून रखडलेल्या नायब तहसीलदारांच्या बदल्या सोमवारी करण्यात आल्या. नाशिक विभागात ४४ तर जिल्ह्यात ११ नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हा निवडणूक शाखेतील नायब तहसीलदार प्रशांत गोसावी यांची नेवासा तहसील कार्यालयात निवडणूक शाखेत नायब तहसीलदार म्हणून बदली झाली. याच शाखेतील शंकर रोडे यांची सामान्य प्रशासन विभागात बदली झाली. राहाता तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार एस.डी. ओहोळ यांना सेवानिवृत्तीपर्यंत याच पदावर मुदतवाढ देण्यात आली.

YouTube video player

श्रीगोंदा येथील निवडणूक नायब तहसीलदार पी. के. नेवसे यांची येवला येथे निवासी नायब तहसीलदार या पदावर बदली झाली. नेवासा येथील निवडणूक नायब तहसीलदार किशोर सानप यांची पाथर्डी येथे नायब तहसीलदार या पदावर बदली झाली. संगमनेर उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार एस. बी. लोमटे यांची शेवगाव येथे महसूल नायब तहसीलदार म्हणून बदली झाली.

संगमनेर येथील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार आर. एम. राऊळ यांची श्रीरामपूरला निवासी नायब तहसीलदारपदी बदली झाली. अकोले येथील संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार एम. ए. माळवे यांची संगमनेर उपविभागीय कार्यालयात बदली झाली. श्रीरामपूरचे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांची निवडणूक शाखेत बदली झाली.

पारनेरचे निवासी निवासी नायब तहसीलदार जी. आर. आढारी यांची संगमनेरला संजय गांधी योजनेत बदली झाली. चोपडा (जि. जळगाव) येथून सचिन किसन बांबडे यांची अकोले येथे संजय गांधी योजनेत नायब तहसीलदारपदी बदली झाली आहे.

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते...