Thursday, September 19, 2024
Homeनाशिकबीएनआय नाशिकचा ११ वा चॅप्टर सुरू

बीएनआय नाशिकचा ११ वा चॅप्टर सुरू

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

बीएनआय नाशिकचा अकरावा चॅप्टर-, “बीएनआय बेंचमार्क” आज ४० सदस्यांसह सुरू झाला. ‘गिरी मीडिया सर्विसेस प्राईव्हेट लिमिटेड’ या नामांकित ऍडव्हर्टायजिंग एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक व ‘बीएनआय ब्राव्हो, ब्लेझ आणि ब्लिट्झ’चे लाँच डायरेक्टर कन्सल्टन्ट श्री. सुभाष लगळी यांनी या चॅप्टरची स्थापना, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री विक्रम माथूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

या मीटिंगला सौ नीता अरोरा, श्री देवेंद्र मुंगी, सौ हिरल पारख, डॉ अश्विन राजे आणि श्री जायेश तळेगावकर या डायरेक्टर कन्सल्टन्ट्स आणि रिजनल ट्रेनर च्या सहाय्य लाभले. मीटिंगचे संचालन सुभाष लगळी यांनी केले तर एज्युकेशन स्लॉटचे संचालनश्री जायेश तळेगावकर यांनी केले. या उदघाटन सभेत १४७ रेफरल्स सामायिक केले गेले तर ४२ व्हिजिटर्स होते.

१०५ सदस्य संपूर्ण सभेला उपस्थित होते. नाशिकच्या इतर BNI चॅप्टर्सच्या लीडरशिप टीमच्या सदस्यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली.बीएनआय चॅप्टरचे प्रेसिडेंट अनस शेख , वाइस प्रेसिडेंट संग्राम गोवर्धने, सेक्रेटरी ट्रेसरर विभा घावरे आहेत

BNI चॅप्टरच्या शुभारंभ सोहळ्याची विशेष बाब ही की १५ सप्टेंबरला ४०वी अनिव्हर्सरी साजरी करणारा हा जगातील पहिलाच पात्र ठरला आहे.BNI ही ३९ वर्षे जुनी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग संस्था आहे ज्यात प्रत्येक व्यवसायातील फक्त एका व्यक्तीला एका चॅप्टरमध्ये सामील होता येते.BNI चे जगभरात ७९ वेगवेगळ्या देशांमध्ये, ८०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या व्यवसायांमधून, ३ लाखांपेक्षा जास्त सदस्य आहेत. या सर्वांना BNI च्या माध्यमामुळे रेफरल वाढून मोठा व्यावसायिक फायदा झाला आहे.

BNI शी संबंधित असणे म्हणजे डझनभर सेल्स प्रोफेशनल्स तुमच्यासाठी काम करण्यासारखे आहे! कारण प्रत्येक कंपनीला आणि उद्योजकाला विक्रीत वाढ व्हायला हवीच असते. BNI ही एक शास्त्रशुद्धरित्या रचलेली रेफरल नेटवर्किंग सिस्टम प्रदान करते जी व्यावसायिक संबंध शेअर करण्यात मोलाची भूमिका बजावते.

या संस्थेचे तत्व “Givers Gain®️” या संकल्पनेवर आधारित आहे: इतरांना व्यवसाय दिलात , तर तुम्हालाही बदल्यात व्यवसाय मिळेल. “जे पेराल ते उगवेल” या जुन्या कल्पनेशी नातं सांगणारीच ही संकल्पना होय.

- Advertisment -

ताज्या बातम्या