Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : करोना चाचणीसाठी 12 लाख सदोष आरटी पीसीआर किट्स

धक्कादायक : करोना चाचणीसाठी 12 लाख सदोष आरटी पीसीआर किट्स

मुंबई –

राज्यात करोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती

- Advertisement -

समोर आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कबुलीमुळे खळबळ उडाली आहे. करोना संसर्गाची तपासणी करण्यात येणार्‍या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जालना येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी माहिती दिली.

राज्य सरकारने खरेदी केलेल्या ॠउउ इळेींशलह ङींव कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला, असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून ॠउउ इळेींशलह ङींव या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणार्‍या या कंपनीवर कारवाई करणार, असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या