Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; १२ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

ऑस्ट्रेलियाच्या बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; १२ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी ही मोठी घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सव सुरू असताना हा गोळीबाराचा थरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर ऑस्ट्रेलियात मोठी खळबळ उडाली आहे. दोन बंदुकधारी व्यक्तींनी हा गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या दोन हल्लेखोरांपैकी एकाचा गोळीबारातच मृत्यू झाला असून दुसऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

न्यू साउथ वेल्स पोलिसांनी याबाबत माहिती दिली, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत पोलिसांनी नागरिकांना बीच परिसरात जाणे टाळण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक अलर्ट जारी केला आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. कृपया त्या परिसरापासून दूर रहा आणि आपत्कालीन सेवांच्या सूचनांचे पालन करा.’

YouTube video player

दोन व्यक्तींकडून अंदाधुंद गोळीबार
सिडनीच्या बॉन्डी बीचवर हनुक्का उत्सवादरम्यान अचानक दोन व्यक्तींनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये किमान १२ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर बॉन्डी बीचवर मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाल्याचेही व्हिडीओत दिसून येत आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटनेदरम्यान सुमारे ५० गोळीबाराचे आवाज ऐकू आले ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. बीचवर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण सैरावैरा पळू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. बीचजवळ आयोजित हनुक्का या ज्यू सणाच्या पार्टीदरम्यान हा गोळीबार झाला.

या गोळीबाराच्या घटनेनंतर सिडनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याबाबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक निवेदन जारी करत घटनेची चौकशी सुरू असल्याचं म्हटले आहे.

अँथनी अल्बानीज यांनी निवेदनात म्हटले की, “बॉन्डी बीचमधील दृश्ये धक्कादायक आणि त्रासदायक आहेत. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी लोकांना मदतकार्य करत आहेत. आम्ही एनएसडब्ल्यू पोलिसांसोबत पुढील तपास करत आहोत. या घटनेच्या अधिक माहितीची पुष्टी होताच पुढील अपडेट्स देऊ.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...