Friday, May 3, 2024
HomeUncategorizedतिसर्‍या लाटेसाठी 125 बेडचे बाल कोविड रुग्णालय

तिसर्‍या लाटेसाठी 125 बेडचे बाल कोविड रुग्णालय

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखण्यासायठी महापालिकेने (Municipal Corporation) गरवारे कंपनीच्या (Garware Company) पुढाकाराने 125 बेडचे बाल कोविड रुग्णालय (Kovid Hospital) उभारणीचे हाती घेतलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे.

- Advertisement -

बेडची व्यवस्था पूर्ण झाली असून ऑक्सिजनची लाइन टाकण्यात आली आहे. तर ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम अद्याप बाकी आहे. बालकांसाठी भिंतींवर चित्र साकारले आहे. दोन एलसीडी लावले आहेत. कोविड सेंटरवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शासन निर्देशांनुसार पालिकेने देखील कोरोनाची तिसरी लाट रोखण्याची तयारी सुरू केली आहे.

जळगाव रोडवरील गरवारे कंपनीच्या शेडमध्ये बाल कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सीएसआर निधीतून कंपनीच्या शेडमध्येच 125 बेडस्चे हे बाल कोविड रुग्णालय उभारले जात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर ते चालवण्यासाठी पालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. येथे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांवर उपचार केले जाणार आहेत. गरवारे कंनीने अत्याधुनिक पद्धतीने बाल कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी बालकांसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था केली आहे.

सर्व सुविधांनी तयार होत असलेल्या या सुसज्ज अशा या बाल कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी नुकतीच येथे पाहणी देखील केली.

प्रमुख वैशिष्ट्ये

बालकांसाठी स्वतंत्र चार विभाग

पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह

13 केएलचा लिक्वीड ऑक्सिजन प्लांट

बालकांसाठी भिंतीवर चित्र, एलसीडी टीव्ही

72 डॉक्टर, कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार

औषधी व इतर साहित्य ठेवण्याकरिता स्वतंत्र रुम

- Advertisment -

ताज्या बातम्या