Friday, May 3, 2024
Homeनाशिक१२५ प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर

१२५ प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात करोनाचा उद्रेक वाढून बाधितांची संख्या 2 हजार 167 वर जावून पोहचली आहे. वेगवेगळ्या भागातून हे रूग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनातर्फे 95 प्रतिबंधीत क्षेत्राची 125 प्रतिबंधीत क्षेत्रात पुर्नरचना केली आहे.

- Advertisement -

या क्षेत्रालगत असलेल्या परिसराला बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.

125 भागांना प्रतिबंधीत क्षेत्राचे सर्व नियम लागू राहणार असून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आले आहे. या क्षेत्रातून बाहेर जाण्यास व आत येण्यास पोलिसांतर्फे मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे नागरीकांनी देखील घराबाहेर पडू नये संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी सदर उपाययोजना करण्यात आली असल्याचे आयुक्त कासार यांनी पुढे बोलतांना सांगितले.

शहरातील कंटेनमेंट झोन

जुना फारान हॉस्पिटल, भावसार गल्ली, नंदन टॉवर, बादशाह खान नगर, वसंतवाडी, नवापुरा, मोहनपीर गल्ली, इस्लामपुरा, डॉ. जाकीर हुसेन नगर, द्याने, शिवम अपार्टमेंट, सामान्य रूग्णालय वसाहत, नंदननगर, शुक्रवार वार्ड, वावीकर गल्ली, शनिवार वार्ड, बेलबाग, बोहरी गल्ली, जैन मंदिर बुधवार वार्ड, सरसैय्यद नगर, करीम नगर, मोहमदाबाद, गोल्डननगर,

सायने, दरेगाव, आजमपुरा, फार्मसी नगर, ताश्कंद बाग, ग्रीन पार्क, न्यू आझादनगर, मदनीननगर, म्हाळदे, गुलशने मालिक, हजार खोली, सोनिया कॉलनी, पाटकिनारा, संगमेश्वर, पटेलनगर, टिळकनगर, ज्योतीनगर, कालिका नगर, बारा बंगला, कॅम्प, वर्धमाननगर, श्रीराम नगर, जैन स्थानक, बापूजी नगर, लोढाभुवन, सप्तश्रृंगी कॉलनी, मोसमपुल, बोरसेनगर,

नालंदा नगर, हिंमतनगर, मोची कॉर्नर, पंचशील नगर, मारवाडी गल्ली, गायत्री नगर, एस.टी. कॉलनी, आदिवासी हॉस्टेल, मोडक गल्ली, सिंधी कॉलनी, जाजू वाडी, साने गुरूजी नगर, संविधान नगर, गुरूवार वार्ड, शिक्षक कॉलनी, अयोध्यानगर, संभाजी कॉलनी, सोयगाव आदी.

- Advertisment -

ताज्या बातम्या