Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये दिवसभरात १३१ रुग्णांची भर

नाशिकमध्ये दिवसभरात १३१ रुग्णांची भर

नाशिक । प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. तर दुसरीकडे पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांसह दिवसेंदिवस नवीन संशयित रूग्णांचे प्रमाणही वाढत असल्याने नाशिककरांची चिंता वाढली आहे.

- Advertisement -

आज एकाच दिवसात जिल्ह्यात १३१ नव्या करोना रूग्णांची भर पडली. यात एकट्या नाशिक शहरातील १०८ आहेत. तर ग्रामिण २३ रूग्ण आढळले आहेत.यामुळे जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा २७६६ इतका झाला आहे. आज शहरासह जिल्ह्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या १६५ झाली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार जिल्ह्याभरात नव्याने १३१ रूग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या नाशिक शहरात १०८ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यात जुने नाशिक 3, खडकाळी पखालरोड ७, पेठरोड 2, पंचवटी , वडाळा ४, श्रमिकनगर, सातपूर 3, टकलेनगर 3,औदुंबर चौक, नवीन नाशिक 3, गोसावी वाडी, द्वारका 3, गंजमाळ 2, गणेशवाडी 2, नवीन नाशिक, फुलेनगर, कथडा, चौकमंडई, हिरावाडी, दिंडोरीरोड, बागवाणपुरा येथील प्रत्येकी एक अशा रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिकशहराचा आकडा 1208 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातील २२ आढळले आहेत. यामध्ये येवला १३, देवळाली २, मुखेड, विंचुर, पिंपळगाव गरूडेश्वर, मोखाडा, इगतपुरी लहवीत, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा ५४४ झाला आहे.

तर मालेगावचा आकडा ९२९ वर स्थिर आहे. करोनामुळे आज ७ जणांचा मत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील ७ जण आहेत. यामुळे मृत्यूचा आकडा १६५ आहे. तसेच जिल्ह्यात आज २९ रूग्ण करोना मुक्त झाले असून बरे होणारांचा आकडा १६१२ वर पोहचला आहे.दरम्यान जिल्ह्यात आजपर्यंत १७ हजार ४७१ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

यातील १४ हजार ३०० निगेटिव्ह आले आहेत, २७६६ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ९३० पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप ४५५ प्रलबिंत आहेत. दरम्यान आज नव्याने ३७१ संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यात नाशिक शहरातील २६७, जिल्हा रूग्णालय १६, ग्रामिण ६१, मालेगाव २३, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ४ अशा संशयित रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: २७६६

मालेगाव : ९२९

नाशिक : १२०८

जिल्हा : ५४४

जिल्हा बाह्य : ८४

एकूण मृत्यू: १६५* कोरोनमुक्त : १६२१

- Advertisment -

ताज्या बातम्या