Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशश्रीलंकेत मुसळधार पावसामुळे 14 जणांचा मृत्यू

श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे 14 जणांचा मृत्यू

कोलंबो – श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. पूरपरिस्थिती आणि मातीचे ढिगारे कोसळून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसाचा 2.40 लाख जणांना फटका बसला आहे. श्रीलंकेतील काही जिल्ह्यांत गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस होत आहे. या जिल्ह्यांतील कित्येक घरे जमीनदोस्त झालीत, रस्ते वाहून गेले, तर शेतांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसाचा फटका 10 जिल्ह्यातील 60,674 कुटुंबातील 2,45,212 जणांना बसला आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख मेजर जनरल सुदांथा रणसिंघे यांनी सांगितले. 3500 पेक्षा जास्त कुटुंबांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले. विस्थापित झालेल्या 15 हजार कुटुंबांसाठी 72 मदत शिबिरांची स्थापना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या