Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटींचा निधी - मुख्यमंत्री शिंदे

केंद्राकडून महाराष्ट्राला १४९२ कोटींचा निधी – मुख्यमंत्री शिंदे

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

YouTube video player

पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या राज्यांच्या मदतीसाठी गृह मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १ हजार ४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्राने केंद्र सरकारकडे काही मागितले की ते लगेचच मिळते, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ हजार ४९२ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा उल्लेख नेहमीच अन्नदाता असा करतात. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विशेष मदत जाहीर करून त्यांनी आपण कोणत्याही संकटात शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या पाठीशी आहोत हे दाखवून दिले आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...