Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामाता न तू वैरिणी! आईकडून १५ वर्षीय मुलाची हत्या

माता न तू वैरिणी! आईकडून १५ वर्षीय मुलाची हत्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

बिहारच्या (Bihar) औरंगाबादमधील (Aurangabad) मदनपूर ठाणा क्षेत्रातील (Madanpur Thana Area) शिवगंजमध्ये (Shivganj) एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबधित महिलेने आपल्या १५ वर्षीय मुलाची हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह (Body) घरातच खड्डा करून पुरला. त्यानंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना (Police) दिली. त्यानंतर बंद असलेले घर लगेचच सील करण्यात आले.

दरम्यान, यानंतर पाटणामधून (Patna) एफएसएलची टीम (FSL Team) दाखल झाल्यानंतर घरातील खड्डा खोदून त्यातून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या