Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी १५५ करोनामुक्त; जिल्ह्यात नवीन १२ रुग्णांची भर; रुग्णसंख्या...

नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी १५५ करोनामुक्त; जिल्ह्यात नवीन १२ रुग्णांची भर; रुग्णसंख्या ७०१ वर

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हाभरात करोनाचा प्रसार वाढत असतानाच आज एकाच दिवशी जिल्ह्यातील 155 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. हा विक्रम मानला जात आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना मुक्त होणाऱ्यांची संख्या 227 झाली आहे. आतापर्यंत या सर्व करोनामुक्त रुग्णांची मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे मोठे समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आज नव्याने १२  रूग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा 701 झाला आहे. तर आतापर्यत जिल्ह्यात करोनाचे 33 बळी झाले आहेत.

- Advertisement -

मालेगाव हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला असून मालेगाव, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या इतर भागातही करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. आज करोनामुक्त झालेले बहूतांश रूग्ण मालेगाव येथीलच असल्याने प्रशासनास मोठा दिलासा मिळाला आहे. एखाद्या जिल्ह्यात एकाच दिवशी 155 रूग्ण बरे होण्याचा हा विक्रम असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये 39 पोलीसांचाही सामावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे करोना मुक्त झालेल्यांची संख्या 227 झाली आहे.

करोना प्रसाराचा वेग मंदावला असला तरी आतापर्यंत करोनामुक्त असलेले तालुक्यांमध्ये रूग्ण आढळत आहेत. आज आज दिवसभरात जिल्ह्यातील 188 अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले यात 8 नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यात एकट्या मालेगाव येथील 5 रूग्ण आहेत. एसआरपीएफचा एक जवान आहे. यामुळे मालेगाव येथील करोना ग्रस्तांची संख्या 553 झाली आहे. 3 अहवाल रद्द करण्यात आले आहेत. तर निफाड, इस्लामपुरा, धुळे व नाशिक येथील प्रत्येकी एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नाशिक शहरात करोना ग्रस्तांचा आकडा 40 आहे. आज यात एकाची भर पडली. हा रूग्ण काठेगल्लीतील त्रिकोणी गार्डन परिसरातील आहे. उर्वरीत जिल्ह्यात 86 पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत. तर यात जिल्ह्या बाहेरील 22 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 35 हजार 474 संशयित रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 6 हजार 292 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 5 हजार 159 निगेटिव्ह, 701 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 501 रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 432 अहवाल प्रलबिंत आहेत.

मालेगावात पाच बाधित; करोनाबाधित शिक्षकाचा मृत्यू

आज दिवसभरात आलेल्या दोघा अहवालात पाच संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळत असताना विद्यार्थीप्रिय व समाजसेवक असलेल्या शिक्षकांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्याने शहरासह पंचक्रोशीत शोककळा पसरली. आज दुपारी जीवन हॉस्पिटल मध्ये 48 वर्षीय या शिक्षकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मालेगावातील एकूण बळींची संख्या 36 वर गेली तर आज पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधित रुग्णांची संख्या 553 वर जाऊन पोहोचली आहे

आज सायंकाळी आलेल्या 183 संशयित रुग्णांच्या अहवालात तब्बल 173 अहवाल निगेटिव्ह आले तर हिम्मतनगर येथील तेवीस वर्षीय युवक व प्रकाश हाउसिंग सोसायटी मधील तेवीस वर्षीय महिला व संगमेश्वर जगताप गल्लीतील 22 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला रात्री आठ वाजेच्या सुमारास आलेल्या अहवालात इस्लामपुरा भागातील 58 वर्षीय इसम तर लोढा भुवन येथील 32 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे लोढा भुवन येथे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने या परिसरात मनपा आरोग्य यंत्रणेतर्फे संशयित रुग्ण तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

मालेगावातील स्त्राव संकलन केंद्रास प्रारंभ

येथील महात्मा गांधी विद्या मंदिर प्रांगणातील विधी महाविद्यालयात संशयित रुग्णांचे स्त्राव नमुने घेण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी 23 जणांचे स्त्राव घेतले गेले. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहे जे रुग्ण दाखल आहेत त्यांचे स्त्राव घेतले जात आहेत. जे होमकाँरन्टाईन राहणार आहेत त्यांना सामान्य रुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांचे संमती पत्र आणावे लागणार आहे.

थोडक्यात महत्वाचे

नाशिक ग्रामीण मध्ये आज ४ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ८६ वर पोहोचली.

नाशिक मनपा मध्ये आज १ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ४० वर पोहोचली.

मालेगाव मनपा मध्ये आज ६ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ५५३ वर पोहोचली.

नाशिकमध्ये जिल्हा बाहेरील रुग्ण १ ने वाढल्यामुळे रुग्णसंख्या २२ वर पोहोचली.

जिल्ह्यात एकूण मृत्यू : ३३ 
नाशिक २
मालेगाव ३१

पूर्णपणे बरे झालेले २२७
मालेगाव २०५
नाशिक मनपा १२
नाशिक ग्रामीण १०

प्रलंबित अहवाल ४३२

- Advertisment -

ताज्या बातम्या