Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखा.सुप्रिया सुळे यांना डॉक्टरांनी दिला 'व्हॉइस रेस्ट'चा सल्ला

खा.सुप्रिया सुळे यांना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला

भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घशाला सूज आली आहे. त्यामुळे आपण पुढील दीड ते दोन आठवडे संपूर्ण ‘व्हॉइस रेस्ट’ घेणार असून या कालावधीत भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहेत, अशी माहिती सुळे यांनी शनिवारी एक्स या समाज माध्यमातून दिली.

सुळे यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत जाऊन नीट पेपरफुटी प्रकरणी सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर दिला होता. तसेच सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात आपण संसदेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

परंतु, आज सुप्रिया सुळे यांनी घशाला सूज आल्याची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतीच घसा आणि आवाजाच्या संदर्भात डॉ. मिलिंद कीर्तने यांची भेट घेतली. तपासणीनंतर त्यांच्या घशात थोडी सूज असल्याचे निदान करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना बोलण्याला विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे.

घसा आणि आवाजाच्या तपासणीनंतर डॉक्टरांनी पूर्ण व्हॉइस रेस्टचा (आवाजाला पूर्ण विश्रांती) सल्ला दिला आहे. मी व्हॉइस थेरपी घेणार असून पुढील दीड-दोन आठवडे भाषणे, मुलाखती आणि दीर्घकाळ बोलणे टाळणार आहे. आपण ही परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, असे सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...