Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसहा बंडखोर खासदारांची शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

सहा बंडखोर खासदारांची शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

शिंदेंच्या शिवसेनेतील खासदारांची संख्या १३ वर

- Advertisement -

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बंडखोरी करून गेलेल्या सहा खासदारांच्या शिवसेना शिंदे गटातील विलीनीकरणावर आज शनिवारी लोकसभा अध्यक्ष अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान आता शिंदेंच्या शिवसेनेतील खासदारांची संख्या १३ झाली आहे.

शिवसेना ठाकरेंच्या पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार संजय दिना पाटील, खासदार संजय उर्फ बंडू जाधव, खासदार संजय देशमुख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासंदर्भातील याचिकेवर आज लोकसभा निर्णय दिला आहे

दरम्यान 17 जूनला या सर्व सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत त्यांना शिंदे गटात विलीन होत असल्यास पत्र दिलं होतं. मात्र या विलीनीकरणाला मान्यता देऊ नये यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं पत्र. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष या 6 खासदारांच्या विलीनीकरणावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं होत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्हा बँकेची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कर्जमाफीच्या घोषणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्थकारणावर यंदाच्या दुष्काळाचेही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य...