Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशट्रम्प रॅलीत सहभागी झालेले 30,000 जण करोना पॉझिटिव्ह, 700 जणांचा मृत्यू

ट्रम्प रॅलीत सहभागी झालेले 30,000 जण करोना पॉझिटिव्ह, 700 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली –

करोना संकट असतानाही येत्या 3 नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं हजारो लोकांना

- Advertisement -

महागात पडलं आहे. तब्बल 30,000 जणांना करोनाची लागण झाली असून 700 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती एका संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सॅनफोर्ड विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आतापर्यंत 18 रॅली निघाल्या आहेत. ट्रम्प यांच्या 20 जून ते 22 सप्टेंबरदरम्यान झालेल्या रॅलीमधून ही माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांच्या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते.

तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांनी मास्कही घातला नव्हता अशी माहिती आता समोर येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेसारखा प्रगत देशही करोना पुढे हतबल झाला आहे. अमेरिकेतील करोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. एखाद्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरं होण्यासाठी साधारण एक आठवडा अथवा दहा दिवस लागतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या