Thursday, May 2, 2024
Homeनाशिकनाशिक प्लॉगर्सच्या पुढाकाराने गोल्फ क्लब मैदानातून १८० किलो कचरा संकलन

नाशिक प्लॉगर्सच्या पुढाकाराने गोल्फ क्लब मैदानातून १८० किलो कचरा संकलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक प्लॉगर्स संस्थेच्या (Nashik Ploggers Association) माध्यमातून रविवार (दि.१२) रोजी येथील अनंत कान्हेरे मैदानावर (Anant Kanhere Ground) (गोल्फ क्लब) स्वच्छता मोहिम उत्साहात पार पडली. या मोहीमेत सुमारे २०० स्वयंसेवकांनी १८० किलो पेक्षा अधिक कचरा गोळा केला…

- Advertisement -

नाशिक प्लॉगर्स, गुरू गोविंद सिंग मेकॅनिकल डिपार्टमेंट,के.के.वाघ महाविद्यालयाचा एलिट क्लब आणि मेट भुजबळ नॉलेज सिटीचा एलिट क्लबच्या सहभागातून हा ड्राईव्ह हाती घेण्यात आला. यावेळी सकाळी ७ वाजता स्वयंसेवकांनी ४ गटात विभागून स्वच्छता मेहीमेला (Cleanliness Campaign) प्रारंभ केला. या मोहिमेत सुमारे २००हुन जास्त सदस्यांनी ड्राईव्हमध्ये सहभाग घेत पर्यावरण स्वच्छ आणि हरित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले.

यावेळी कचरा गोळा करण्यासोबतच सकाळी व्यायामासाठी मैदानावर येणार्‍या नाशिकरांमध्येही प्लास्टिक कचर्‍याबाबत (Plastic waste) जनजागृती करण्यात आली. तसेच मैदानासमोर ‘चॉक ऑफ अवेअरनेस’ ही संकल्पना राबविण्यात आली. तर प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागद, खाद्यपदार्थांचे रॅपर आणि जमिनीवर साचलेला कचरा स्वयंसेवकांनी उचलला. याशिवाय संस्थेच्या अध्यक्ष सई पाटील यांनी नाशिक प्लॉगर्सच्या कामाची माहिती देऊन आपल्यासोबतच इतरांनाही प्लास्टिकबद्दल जागृत करण्याचे आवाहन केले.

दरम्यान, याप्रसंगी संस्थेचे संस्थापक तेजस तलवारे यांनी मायक्रो प्लास्टिकबद्दल जमलेल्या स्वयंसेवकांना (volunteers) माहिती देऊन जनसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच मनकी बात फेम चंदू पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी नागरिकांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या