Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यादेशवंडीत वीज कोसळून युवतीचा मृत्यू

देशवंडीत वीज कोसळून युवतीचा मृत्यू

सिन्नर | प्रतिनिधी

तालुक्यातील देशवंडी येथे आज (दि ४) दुपारी वीज पडून अक्षदा विलास कापडी ही 19 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

देशवंडी सिन्नर रस्त्यावरील दोबी मळ्यात कापडी कुटुंबीय शेतातच घर बांधून राहतात. आज दुपारी दोनच्या दरम्यान रीमझिम पावसाला सुरुवात झाली.

अडीच वाजेच्या दरम्यान अचानक वीज पडल्याने घराबाहेर उभी असलेली अक्षदा जागेवरच गतप्राण झाली.

अचानक झालेल्या आवाजाने कुटुंबातील इतर नागरिक धावत बाहेर आले. तेव्हा अक्षदा जमिनीवर पडली होती.

सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. मयत अक्षदा तिच्या पश्चात आई-वडील, आजी व एक लहान भाऊ आहे. तिच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या