Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशराम मंदिर जमीन घोटाळा : काँग्रेस, शिवसेना आक्रमक

राम मंदिर जमीन घोटाळा : काँग्रेस, शिवसेना आक्रमक

अयोध्या :

राम मंदिर ट्रस्ट जमीनीच्या घोटाळ्याच्या आरोपावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आप नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी ट्रस्टवर गंभीर आरोप केले होते. २ कोटी रुपयांची जमीन पाच मिनटांत १८.५ कोटी रुपयांमध्ये विकली गेल्याचा आरोप केला. या आरोपानंतर काँग्रेस व शिवसेना आक्रमक झाली आहे. काँग्रेसने या प्रकरणात भाजपलाही ओढले आहे. या प्रकरणात भाजप नेते सहभागी असल्याचे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.

- Advertisement -

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करत आरोप केल आहे की,

हे राम,

ये कैसे दिन…

आपके नाम पर चंदे लेकर घोटाले हो रहे है।

बेशर्म लुटेरे अब आस्था बेच ‘रावण’ से अहंकार में मदमस्त हैं।

सवाल है कि ₹2 करोड़ में ख़रीदी ज़मीन 10 मिनट बाद ‘राम जन्मभूमि’ को ₹18.50 करोड़ में कैसे बेची?

अब तो लगता है …

कंसो का ही राज है, रावण हैं चहुँ ओर !

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी अयोध्येत राम मंदिराचं निर्माण करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने दोन कोटी रुपये दराची जमीन 18 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यांनी सांगितलं की, हे थेट पैशांच्या अफरातफरीचं प्रकरण आहे आणि सरकारने याची सीबीआय आणि ईडीमार्फत तपास करावा.

शिवसेना आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यांनी सांगितले की, “या प्रकरणी ट्रस्टच्या प्रमुखांनी समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला हवं. सरकारने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही खुलासा करणं गरजेचं आहे. ज्यांनी अयोध्येसाठी मंदिरासाठी लढा दिला आहे, त्यांना कळणं गरजेचं आहे की, नक्की तिथे काय घडलं. संपूर्ण जगातून श्रद्धेपोटी शेकडो कोटींचा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी दिला आहे. राम मंदिराच्या नावावर सामान्यांकडून देणगी घेण्यात आली आहे. श्रद्धेतून गोळा झालेल्या निधीचा गैरवापर होत असेल तर त्या श्रद्धेला काहीच अर्थ उरत नाही,’.

काय आहे प्रकरण

आपचे संजय सिंह यांनी राम मंदिराच्या जमिनीसंदर्भात काही दस्तऐवज सादर केले. त्यांनी म्हटले की, “मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या नावावर भ्रष्टाचार आणि घोटाळा करण्याची हिंमत करु शकेल, याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय यांनी कोट्यवधी रुपये लंपास केले.” अयोध्या तहसीलमध्ये येणाऱ्या बागा बिजैसी गावातील पाच कोटी 80 लाख रुपये किंमतीची जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी या दोन व्यक्तींनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून 18 मार्च रोजी दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी झालेल्या या जमीन व्यवहाराचे साक्षीदार राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा आणि अयोध्याचे महापौर ऋषिकेश उपाध्याय बनले होते. मात्र त्यानंतर पाचच मिनिटांनी चंपत राय यांनी हिच जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांच्याकडून साडे अठरा कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. त्यापैकी १७ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या