Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशअबब घरात नोटांचा ढीग; पैसे मोजता मोजता ईडीच्याही नाकी नऊ

अबब घरात नोटांचा ढीग; पैसे मोजता मोजता ईडीच्याही नाकी नऊ

नवी दिल्ली । New Delhi

पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी (Partha Chatterjee) यांचे निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांच्या घरावर ईडीने धाड टाकली असता त्या धाडीत तब्बल २० कोटी रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (West Bengal School Service Commission) आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील ( West Bengal Primary Education Board) भरती घोटाळ्याशी (scam) संबंधित विविध ठिकाणी ईडी शोध मोहीम राबवित असून त्यानुसार धाडी टाकल्या आहेत. तसेच ईडीने २० मोबाईल कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त केल्या आहेत. तर जप्त केलेली रोकड ही स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी (School Service Commission scam) निगडित असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालयाला (ED) आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या मंत्रिमंडळात पार्थ चटर्जी सध्या उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत. एसएससी घोटाळा झाला, तेव्हा चटर्जी शिक्षणमंत्री होते. याच चटर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अर्पिता यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. तसेच या घोटाळ्यात ज्यांची नावे समोर आली आहेत त्यांच्याविषयी उत्तरं देणं वकिलांचे काम आहे. आम्ही तूर्तास हे काय प्रकरण आहे ते बारकाईने पाहात आहोत. वेळ आल्यावर आम्ही या प्रकरणी प्रतिक्रिया देऊ असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या