Friday, May 3, 2024
Homeजळगावप्रेमविवाहाच्या प्रमाणात 20 टक्के वाढ

प्रेमविवाहाच्या प्रमाणात 20 टक्के वाढ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एकत्र कुटुंबपध्दती (Joint family approach) संपुष्टात येत असल्याने व थोडया फार प्रमाणात सोशल मिडीयामुळे (social media) एकमेकांतील संवाद संपत (End of conversation) चालला आहे. स्त्री-पुरुष (men and women) परस्परांचे शत्रू (Not the enemy)नसून ते दोघे एकत्र आल्याशिवाय जीवन सुकर होवूच शकत नाही. प्रेमविवाह (love marriage) करण्याचे प्रमाण पूर्वी 4 टक्के होते आता ते प्रमाण 20 टक्क्यापर्यंत गेले असल्याचे मत वक्ते रवींद्र पंढरीनाथ (Speaker Rabindra Pandharinath) यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष सहजीवन या विषयावर ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,दैनंदिन जीवनात जगत असतांना स्त्री-पुरुष व पती पत्नी यांच्यातील संवाद व परस्परांतील ताळमेळ व्यवस्थित असेल तर तुमचे जीवन सुकर होईल.मात्र, सध्या समाजात एकत्र कुटुंबपध्दती संपुष्टात येत असल्याने व थोडया फार प्रमाणात सोशल मिडीयामुळे एकमेकांतील संवाद संपत चालला आहे. स्त्री-पुरुष परस्परांचे शत्रू नसून ते दोघे एकत्र आल्याशिवाय जीवन सुकर होवूच शकत नाही.

प्रेमविवाह करण्याचे प्रमाण पूर्वी 4 टक्के होते आता ते प्रमाण 20 टक्क्यापर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे हया अध्यक्षस्थानी होत्या. प्रा.सोनवणे म्हणाल्या की, कुटुंब स्थिर ठेवायचे असेत व प्रगती करायची असेल तर परस्परातील संवाद गरजेचा आहे.

प्रास्ताविक विभागाचे संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वर्षा परदेशी हिने तर सूत्रसंचालन जितेंद्र राठोड याने केले. आभार यश पानपाटील यानी मानले.

पती-पत्नीत सुसंवाद असेल तर जीवन सुकर

दैनंदिन जीवनात जगत असतांना स्त्री-पुरुष व पती पत्नी यांच्यातील संवाद व परस्परांतील ताळमेळ व्यवस्थित असेल तर तुमचे जीवन सुकर होईल असे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाच्यावतीने आयोजित व्याख्यानमालेत एकविसाव्या शतकात स्त्री-पुरुष सहजीवन या विषयावर रवींद्र पंढरीनाथ म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या