नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency Election) निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता या निवडणुकीमध्ये एकूण २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. आज बुधवार (दि. १२ जून) रोजी उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीतून कोण माघार घेतो? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
हे देखील वाचा : मविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार
परिणामी काही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अद्यापही आपले अर्ज तसेच ठेवल्याने बंडखोरीची लागण झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे (Congress) उमेदवार दिलीप पाटील, तसेच अपक्ष उमेदवार राजेंद्र एकनाथ विखे पाटील, भाजपप्रणित अपक्ष उमेदवार धनराज देविदास विसपुते, अपक्ष उमेदवार भास्कर तानाजी भामरे, अविनाश साळी, सुनील पंडित, दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, जायभावे कुंडलिक दगडू यांच्यासह आदी एकूण १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे.दरम्यान १५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात आता २१ उमेदवार उभे असून त्यात प्रामुख्याने महायुती व महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे दिसते.
हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात
यामध्ये महायुतीमधील (Mahayuti) शिंदेंच्या शिवसेनेकडून किशोर भिकाजी दराडे (Kishor Darade) अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र मधुकर भावसार, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेकडून संदीप गोपाळराव गुळवे (Sandeep Gulve) समता पार्टीचे भागवत धोंडीबा गायकवाड, तसेच अपक्ष म्हणून अनिल शांताराम तेजा, अमृतराव उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, इरफान मो. इसहाक (नादिर), भाऊसाहेब नारायण कचरे, विवेक बीपीन कोल्हे, रवींद्र माधवराव कोल्हे, संदीप वसंतदादा कोल्हे, भगवान पंडित गवारे, संदीप वामन गुरुळे, सचिन रमेश झगडे, दिलीप काशिनाथ डोंगरे, छगन भिकाजी पानसरे, रणजीत बाबासाहेब बोंडे, महेश भिका शिरुडे, रतन राजलदास चावला, आरडी निकम, संदीप गुळवे (पाटील) यांच्यासह प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे
दरम्यान, यात प्रामुख्याने रतन चावला हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. तर विवेक कोल्हे हे भाजपचे बंडखोर उमेदवार आहे. तर विधान परिषदेची खरी लढत ही महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जून रोजी मतदान (Voting) होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा