Friday, September 20, 2024
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; 'हे' उमेदवार रिंगणात

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात

नाशिक | Nashik

- Advertisement -

लोकसभेनंतर राज्यात विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीत गुंतल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात लोकसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) एकत्र असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील (Mahayuti) प्रत्येक पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधान परीषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची चुरस वाढतांना दिसत आहे.

हे देखील वाचा : मविआचा नाशिक शिक्षक मतदारसंघाचा तिढा सुटला; कॉंग्रेसच्या उमेदवाराची माघार

त्यातच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने मविआतील नेते एकमेकांशी चर्चा करून आपले उमेदवार मागे घेत आहेत. तर महायुतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा समन्वयाचा अभाव दिसत नसल्याचे समोर येत असून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शिक्षक मतदारसंघात (Nashik Teacher Constituency) देखील महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुती पुरस्कृत उमेदवार व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे. तर दुसरे महायुती पुरस्कृत उमेदवार धनराज विसपुते यांनीही नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र,असे असले तरी महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर भिकाजी दराडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अॅड. महेंद्र भावसार व भाजपचे पदाधिकारी विवेक कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार आता नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे संदीप गुळवे, महायुतीचे किशोर भिकाजी दराडे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

शेवटच्या दोन दिवसांत १५ उमेदवारांनी घेतली माघार

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुीकत माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत आता २१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. याआधी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यात काल ४ जणांनी तर आज ११ उमेदवारांनी माघार घेतली. दरम्यान ३१ मे ते ७ जून,२०२४ या कालावधीत ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यात १५ उमेदवारांनी माघार घेतली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या