Wednesday, October 16, 2024
HomeनाशिकNashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा...

Nashik News : नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

नाशिक | Nashik

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडमोडी घडतांना पाहायला मिळत आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून या दिवशी नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे (Sandeep Gulve) यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

- Advertisement -

तर महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे नामसाधर्म्य असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने ८ जूनच्या दुपारी अडीच वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणूक : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज केले दाखल

त्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे पोलीस सुरक्षेत कोपरगावकडे रवाना झाले होते. यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. त्यानंतर अखेर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर अपक्ष उमेदवार संदीप गुळवे या उमेदवाराने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने संदीप गुळवे या उमेदवाराला राज्याबाहेर नेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तावडीतून संदीप गुळवे यांना सोडवून आणल्याचा दावा देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांनी ५३ नामनिर्देशन पत्रे दाखल केले होते. त्यापैकी ३६ उमेदवारांचे अर्ज वैध व दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. आता माघारीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीकडून नाम साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी २६ जूनला मतदान होणार असून १ जुलैला मतमोजणी होणार आहे. तर खरी लढत ही महायुतीचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे, महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या