Friday, May 3, 2024
Homeजळगावरावेर तालुक्यात मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी 

रावेर तालुक्यात मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी 

रावेर Raver|प्रतिनिधी-

तालुक्यातील मुदत संपलेल्या (Expired) 22 ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंच (Public Appointed Sarpanch) व सदस्यांच्या (members)  निवडणूका (Elections) १८ डिसेंबर रोजी  होणार आहे.  महसूल प्रशासनाने (Revenue Administration) निवडणूकीची तयारी (Preparation complete) पूर्ण केली आहे या गावांच्या मतदार याद्या (voter lists) २१ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर सरपंच पदाचे आरक्षण यापूर्विच जाहिर झाले आहे. अशी माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे (Tehsildar Usharani Devgune)यांनी दिली.

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

यामुळे निवडणुकीसाठी या गावांमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.तालुक्यात १८ डिसेंबर रोजी या निवडणूका होतील.

यासाठी दि.१८ नोव्हेंबर – नोटीस प्रसिद्ध करणे, दि.२८ नोव्हेंबर  ते २ डिसेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करणे,५ डिसेबर – नामनिर्देशन पत्राची छाननी, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख -दि.७ डिसेंबर व नंतर चिन्ह वाटप, दि.१८ डिसेंबर सकाळी ७.३० ते ५.३० पर्यन्त मतदान,दि.२० डिसेंबर मत मोजणी होईल.

रावेर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ग्रामपचायत निहाय सरपंच व सदस्यांचे आरक्षण, प्रभाग रचना यापूर्विच झाली आहे .

मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठारपत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप

ग्रामपंचायतीचे गाव सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे –

सर्वसाधारण – दोधे, वाघोदा बु ॥, सर्वसाधारण महिला राखीव – बलवाडी, भाटखेडा, नेहेते – नागरिकांचा मागासप्रवर्ग – कांडवेल, कुंभारखेडा, सावखेडा बु ॥, नागरिकांचा मागासवर्ग महीला राखीव – खिरोदा प्र . यावल, अनुसुचित जमाती राखीव – निंभोरासिम, शिंगाडी, गाते, कोचूर खूर्द, अजंदे .अनुसुचित जमाती महिला राखीव – अटवाडे, धुरखेडा, सिगत, खिरवड . अनुसुचित जाती राखीव – नांदूरखेडा, सुनोदा . अनुसुचित जाती महिला राखीव – थोरगव्हाण या ग्राम पंचायतींची मुदत संपली आहे .

ग्राम पंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्यामुळे या गावात लोकनियुक्त सरपंच व वार्ड निहाय मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या