Monday, May 6, 2024
HomeUncategorizedराजकीय नेत्यांच्या कार्यालयांनाच कोरोनाचा विळखा : भुजबळांकडील 22 जणांना बाधा

राजकीय नेत्यांच्या कार्यालयांनाच कोरोनाचा विळखा : भुजबळांकडील 22 जणांना बाधा

राज्यात कोरोनाचा संसर्ग गुणाकाराने सुरु अनेक मंत्री, आमदार व मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना(corona) झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chagan bhujbal)यांच्या मुंबईतील कार्यालयातील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात भुजबळ यांच्या निवासस्थानातील काही तर काही जण कार्यालयातील आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(dilip walse patil) यांच्या कार्यालयातील कोरोना बाधितांती संख्या 21 झाली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रूटी, नेमके काय झाले पाहा फोटोमधून

- Advertisement -

छगन भुजबळ यांच्या कार्यालयात देखील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे कार्यालयांनाच कोरोनाचा विळखा बसल्याचे उघड झाले आहे.

अनेक मंत्र्यांच्या घरात व संपर्क कार्यालयात करोनाने शिरकाव केला आहे. भुजबळ यांच्या कार्यालयातील 22 जणांना करोना बाधा झाली असून भुजबळ यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना केले आहे. भुजबळ यांनी त्यांचे दौरे रद्द केले असून उद्या होणार्‍या डिपीडिसीला ते आँनलाईन हजेरी लावणार असल्याचे समजते.

श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले…

वळसेंच्या कार्यालयातील २१ जण बाधीत

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील कोरोना बाधितांती संख्या 21 झाली आहे. दरम्यान, यापूर्वी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या